तुटलेले दुवे - सोन्याचें तव हें घडयाळ सख...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
सोन्याचें तव हें घडयाळ सखये, देशी मला कासया ?
याची हीणवणूक कां ? खचित हें शोभे न रडकास या.
आहेत स्मृति ज्या खचून भरल्या दुष्पूर माझ्या मनीं
होती सर्वच त्या सुवर्णमय गे स्पर्श तुझ्या साजणी.
या निर्जीव अलडकृतीवर पहा न प्रेम माझें ठेर
दिव्यालङकरणें खुले बहु जरी सौन्दर्य तूजें खरें;
या तूज्या विभवीं कितीक असती जे अंशभागी तुझे
दे हें त्यांस, मला तुझें स्मित पुरे, काही न देऊं दुजें.
लोकांनी म्हटलें किती जरि मला ‘हा क्षुद्र निष्काञ्चन !’
चिन्ता ती न करींच मी, मनिं कधी त्याची शिवे आच न;
सोन्याचें स्मित मुग्ध हार्दिक तुझें राहील माझ्यावर
सन्तोषें अमरावतींतहि तरी राहीन मी पामर.
का या भेटिमधे असे ध्वनि तुझा काही तरी मङगल ?
सोन्याचा क्षण सावधान धर हा, जाऊल हा चञ्चल.
२३ मार्च १९३४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP