मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
नेत्रीं बुद्धि पहा स्वतन्...

तुटलेले दुवे - नेत्रीं बुद्धि पहा स्वतन्...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


नेत्रीं बुद्धि पहा स्वतन्त्र, वदनीं आरक्त सौम्यच्छटा !
हें अव्याज निसर्गसुन्दर असें राहील का कैरव ?
येऊ ही अपुल्या पणांत तरिही घोटाळतें शैशव,
हें ऊत्फुल्ल बघूनि रूप ऊपजे कां गूढ ही खिन्नता ?
शैला हासत पायरी विसरुनी, देऊ तुला दूषणें -
“शोभे काय वयांत या खिदळणें ? निर्भीड हें वागणें ?
आलें शिक्षण होत, थिल्लरपणा जाऊचना शिक्षणें !
खोडया या पुरुषी”- “तुम्ही ऊलट हीं माना महाभूषणें”,
होतों पीत चहा तिघेंत असतां सन्ध्या हिवाळ्यांतली.
केला प्रश्न तुवां मधेच मजला पाहूनि पर्युत्सुक;
मी ओळी वरच्या रचूनि म्हणतां केलें तुवां कौतुक;
गेला तो क्षण त्यास आज चवदा वर्षे पुरीं जाहलीं.
शैला आज कुठे ? तुझीं बदलली नावें. रहाशी दुरी,
ती आज स्मृति ये अचानक वरी ऊदध्वस्त माझ्या ऊरीं.

२ सप्टेम्बर १९२२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP