तुटलेले दुवे - दोघेही शिकलों अनेक वरुषें...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
दोघेही शिकलों अनेक वरुषें ऐकत्र वर्गांतुनी
होतों भेटत नित्य अन भटकलों ऐकत्र रात्रींवनीं,
गप्पागोष्टि, पुढील बेत करितां गेले सुटीचे दिन,
सन्ध्याही किति शाद्वलाङगणिं तशा खेळामधे कर्मिल्या !
विद्वन्मान्य अशा अनेक पदव्या दोघांसही लाभल्या,
दैवें सेवक राजमान्य म्हणुनी सर्कार घेऊ तुला;
दोघांची पडतां अचानक अशी ही गाठ गण्डस्थलीं
चित्ता आठवणी जुन्या हलविती त्या गोड काळांतल्या,
गेलों होऊनि लोकदास म्हणुनी मी पायचाली फिरें,
तू साहेब, बगींत सन्निध तुझ्या राणी तुझी सुन्दर !
ती कोणीहि असो, तुला न पटते माझी गमे ओळख,
माझी द्दष्टि फिरे तुझ्याच भवती तू तों तिला टाळिशी,
जा जा ! जाल तुम्ही बसूनि चढुनी त्या स्वीय गिर्याश्रमीं,
पायांनी अपुल्या चढूनि वरती गाठीन शैलाग्र मी.
२ मे १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP