मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
होतें प्रेम तसें तुझें मज...

तुटलेले दुवे - होतें प्रेम तसें तुझें मज...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


होतें प्रेम तसें तुझें मजवरी पूर्वीचपासून की !
झालों ऐक कसे अता ऊभयता आलिङगनें चुम्बनें !
झालों धन्य अनन्य रन्त मिळतां प्रक्षुब्ध सिन्धूदकीं,
मृत्यो, अमृत लाभलें मज अता कोठेहि येथून ने ?
मी काहीतरि बोलतों, त्वदधरीं आहे सुधा का सुरा ?
मी - मी हा पडतों. स - सावर मला तू बाहुपाशामधे !
राहूं देच ऊरास ऊर भिडला, गे या वियोगातुरा
प्याला आणिक पाज,  अन्तिम गती दे, गाढ आराम दे !
का हें स्वप्नच ? हाय ! भेद तुझियामाझ्यामधे केवढा ?
मी निष्काञ्चन काजवाच, धनिके, वर्णें गुणें शुक्र तू !
कोठे ऊन्च सुवर्णचम्पक, कुठे निर्गन्ध मी तेरडा ?
होतां तू मम मी शतक्रतु नव्हे, होऊ सहस्रक्रतू !
या लाजा, नच तारका; अरुण हा तेजोनिधी पावक,
चालूं सप्तपदें धरीं कर करीं, हो देव साहायक !

१५ ऑगस्ट १९२६

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP