मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
तुटलेले दुवे

तुटलेले दुवे

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


तूतें केवळ ऐक रङिगत छबी वा शैलमूर्ती कुणी
जी लावण्यखनी असूनिहि असे निर्जीव, हें मानुनी,
नेत्रांना सुखवीत कां न निववूं  वृत्ती कलाकौतुकीं ?
छो ! मानव्य तुझे जिवन्त बघतां वाञ्छा सदाची भुकी.
किंवा कां न गणूं तुला गगनिंची तारा कुणी दुर्लभ
व्योमीं कृष्ण विशेष धीरसुख दे द्दष्टी जिची सुप्रभ ?
आटोक्यांत दिसूनि मोहवुनि तू देशी झुकाण्डी पुढे,
तू निश्चिन्त चतूर गुङगतच जो पाण्यावरूनी ऊडे,
झञ्झावात सुटूनि हा चहुकडे मोठा धुळोरा कुठे,
मी माळावर वादळीं गवसलों, येथे निवारा कुठे ?
येऊ तोच वळीत्र पाऊस करी हा पाण - मारा जवें,
सृष्टीचा मळ तो धुवूनि नटवी तीतें नव्या वैभवें.
झाले भग्न तरू तरी चहुकडे ही शान्ति, ऐत्साह हा !
आशांनो, तुटुनी पड ! नयन हो वर्षा ! किती दाह हा !

१६ एप्रिल १९३०

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP