तुटलेले दुवे - दैवा, निर्धन राहुं दे मज ...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
दैवा, निर्धन राहुं दे मज नको ख्याती, परी दे मला
अङगीं थोर सहिष्णुता, रसिकता ऊशी कुणी प्रेमला;
काही तींत नसो अलौकिक असें काव्यात्म वा सुन्दर;
या लोकीं सुख मध्यमक्रामच दे, न स्वर्ग ये भूवर.
हा सारा ऊपयोगवाद ! न रुचे निकृष्ट वाञ्छा अशी.
चालेल प्रतिबिम्बिला तरि हवा हातीं नभींचा शशी.
खद्योतावलि नावडे, मज हवी नेत्रांस जी दीपवी;
ती तेजस्तनया हुतात्महि करो पाडूनि शीर्षीं पवी.
होवो ऊत्सवमूर्ति ती जणु ऊषा, वा शान्त सन्ध्यासती,
वा ज्योत्स्ना हुरहुर जी मधुर दे स्वप्नाळु जीवास ती,
किंवा दुर्दम घूर्णवायुलहरी जी ऊन्च नेऊ नभीं,
किंवा तैशिच सिन्धुवीचि बुडवी जी, तीजला मी न भीं.
दैन्याचा दिन दीर्घ कां यम जरी अन्तीं करी भक्षण ?
सारी ऊत्कटता जयांत भरली द्या तोच ऐक क्षण.
९ सप्टेम्बर १९२८
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP