तुटलेले दुवे - तू दारांत विचारिलें थबकुन...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
तू दारांत विचारिलें थबकुनी, “आलांत केव्हा तुम्ही ?”
अन लाडीक तुझ्या खटयाळ वदनीं हास्यच्छटा रङगली.
“जा गे. साङग चहा घरांत ! बघशी कां नेत्र विस्फारुनी ?”
झिपें घ्यान बघा, म्हणेल कुणिही ‘भिल्लीण ही जङगली.’
जातां तू मज तो म्हणे, “धिटुकली साधी किती पोरटी !
लाडाने म्हणतों घरांत बिजली शारूस या” - आंतुनी
ताटें घेऊनि धाप टाकित पुढे आलीस तू गोरटी,
देतां ताट करीं तुझा पदर तो जाऊ मला चाटुनी. -
“भारी धान्द्रट ! ये अशी बस ऊथे घे दिल्रुबा तेथला,
काही दाव कला, स्तुती करिल हा. ठावें न या फारसें” -
“मी जाणार फिरावयास, मजला काही न येते कला;
तू मित्रास तुझ्याच दाखव कथा - त्या काढ, आता असें ?”
तेव्हाची ‘बिजली’ किती मज रुचे ‘भिल्लीण’ ती ! छे अता
या भोळ्यास खुळा करूनि, बनली दुर्धर्ष ती देवता !
या भोळ्यास खुळा करूनि, बनली दुर्धर्ष ती देवता !
३१ मार्च १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP