तुटलेले दुवे - ज्याची गोड सुबोध भावकविता...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
ज्याची गोड सुबोध भावकविता कोणासही तोषवी.
सृष्टींतील मुलां - फुलांस बघतां वेडाच जो हो कवी,
बोजे जो ‘प्रभु मी अजूनिहि ऊणा’ जातां प्रभूच्याकडे
त्याची वन्द्य समाधि रूक्ष विजनीं ऐकीकडे कां पडे ?
त्याचें हें थडगें भिकार दिसतें मातीविटांचें पुढे
जाऊ होऊनि नावही पुसट हें पाटीवरी बापुडें :
“आकाशांत फुलें धरेवर फुलें” त्याने असें गाऊलें -
सारें तें परि पुष्पवैभव अता काव्यींच हा राहिलें !
ज्याचीं काव्यफुलें बघूनि हसती जीं रन्जलीं गान्जलीं,
किंवा सान्त्वन ती तुक्यापरि करी ज्याची अभङगाञ्जली,
कां हो मर्मर - पुष्प शुभ्र न कुणी ठेवी तदस्थींवरी ?
का नारायण आपुला न कवि की येशुप्रशस्ती करी ?
रक्षी अस्थिसवें प्रिय स्मृति तुझी स्वान्तीं महाराष्ट्रभू,
बोलें वाहुनि मीहि अश्रुसुमनें की शान्ति देवो प्रभू !
२६ ऑक्टोबर १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP