तुटलेले दुवे - आशी पोर सुरेख ही चिमखडी आ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
आशी पोर सुरेख ही चिमखडी आहे कुणाची बरें ?
तों ये चम्पकगौर चारु युवती शालीन कोणी त्वरें,
साडी नील महेश्वरी, भरजरी चोळी खुले तप्किरी,
तोडेगोठ सुवर्ण गोण्डस करीं, मूर्ती दिसे साजिरी,
होतां मान वरी दिसे मधुरता गम्भीरता लोचनीं
बोले ती “चल मञ्जुबाळ !” परते बोलूनि हें तत्क्षणीं;
लक्ष्मी ही गृहदेवताच पण कां भालीं न सौभाग्य हा !
“रावांची गृहिणीच” तो कुणि म्हणे, “संसारशोभा पहा !”
वर्षांनन्तर आठ मीं पुनरपी त्यांना पथीं पाहिलें
लज्जारक्षक पातळांत, न जुनें ऊश्वर्य तें राहिलें.
शान्ती तीच परी मुखीं, वर तिथे येऊ उदासीनता
तों बोले कुणि, “पोर वारिल परी आता हिची दीनता.”
टाकी जी पुरुषावरी भरवसा ती हो अशी वञ्चित,
संसारीं भलताच कां संवगडी गाठूनि दे सञ्चित ?
१० जानेवारी १९२४
Last Updated : November 11, 2016
TOP