तुटलेले दुवे - होतें काय तुला ? कितीक दि...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
होतें काय तुला ? कितीक दिसशी निर्विण्ण तू पाण्डुर !
अस्वस्थ्येंच असा कुठे भटकशी ? हें काय तूझ्या करीं ?
काव्यांची तुझिया वही तर ? तुझ्या चित्तीं कुठे काहुर
पद्यीं व्यक्त करूनि तेंच करिशी ना शारदाचाकरी ?
छे छे ? का मग अल्पजीवि मधुर स्वप्नांत तू रङगशी ?
भासे द्दश्य मनोज्ञ तों तुज गमे की ध्येय तेथे स्थिरे,
हो अन्तर्हित तोंच तें, मग फुल्या शोकांत तू स्फुन्दशी,
अन सौन्दर्यभुलावणींत फिरुनी वाढे तुझें काविरें.
प्रीतिध्येय सुशान्त शाश्वत तुला लाभे न कोण्या स्थळीं.
काव्यें सुन्दर हीं लिहूनि म्हणशी अस्वस्थता ना टळे,
ऐणें जाशिल मासळीपरि जिवें जी जीवनावेगळी,
स्वप्नाळूपण सोड, सोड भय, घे हें तत्त्त्र मोलागळें -
देहाने कर कष्ट, सोड कविता, ऊडुण नाही नरा.
दाणा पेर, कसूनि पीक पिकवीं, रे तूज बाही धरा.
१३ ऑक्टोबर १९२६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP