तुटलेले दुवे - पाले, कन्द, मुळ्या कुठे ज...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
पाले, कन्द, मुळ्या कुठे जमवुनी हिण्डूनि रानींवनीं
बैसे माण्डुनि मावळा, कुणि तरी घेऊल आशा तया.
पाहूनी दुरुनीच पौरजन हे जाती निघूनी झणी,
कोणा ठाऊक काय नाव, कुठला तो धर्म पाल्यांत या ?
अङगीं घोङगडिची निरस्तर असी बण्डी, न बाहया तिला;
मुण्डासें कसचें ? मलीन दिसते माथ्यावरी चुम्बळ;
लङगोटीं करि लाज राखण, कधी तो कम्बरेचा विळा;
भासे संशायि दीन मूढ वदनीं सोशीकतेचें बळ.
सहयाद्रीपरि या सनात्नच तू माझ्या सख्या बन्धवा.
राज्यक्रान्ति कितीकदा घडुनिही तूझाच शुद्धार न.
कोणी राज्य करो, समानच तुला ऐकादशी - पाडवा,
रे कूठ द्विज हो ! मनूंतिल नव्या हो क्षत्रिय ब्राम्हाण !
शेतें तू कसशी नि तू पिकविशी धान्य स्वकष्टश्रमें
आतां नाङगरुनी समाज पिकवी राष्ट्रैक्य तू विक्रमें.
७ डिसेम्बर १९३७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP