तुटलेले दुवे - कष्टी, क्षीण, निराश, पाण्...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
कष्टी, क्षीण, निराश, पाण्डुर दिसे जी मृत्युशय्येवरी
ती स्वप्नांत मला अजूनि कितिदा शैला पहा भेटते.
नाचे, हूडपणें हसे गुण रमे शस्याङगणींची परी,
बाल्यींचे किति खेळ खेळुनि मला ती भेटवी थेट तें.
तैशी तूहि सखे, मला कितिकदा स्वप्नामघे मेटशी.
लाडाने हितगूज बोलत सदा आशा नवी लाविशी,
प्रत्यक्षीं भलता प्रकार करिशी पाडूनि नेमें फशी,
मागूं न्याय कुणाकडे तुजविना होऊ गुन्हा त्याविशीं.
स्वप्नीं तोडूनि देहबन्ध म्हणती आत्मे सुखें मीनती,
तेवी वर्तविती भविष्य, सहसा मर्त्यास जें नाकळे,
ऐकाङ्गी परि कल्पनाच गमते ही, होय माझी न ती,
माया फोल कळूनि अन्तर कसें मागूनि हें जाकळे !
ती निद्रा पडती न जींत फसवीं स्वप्नें, कधी येऊल ?
द्याया शान्ति मला कुशींत अपुल्या प्रेमें कधी घेऊल ?
५ ऑक्टोबर १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP