तुटलेले दुवे - रूढीचाच समाज दास, तुडवी न...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
रूढीचाच समाज दास, तुडवी निष्पाप भावाङकुर,
वाटे घोर अवर्षणेंच सुकलीं प्रीतीसवें आसवें;
स्त्रीसौन्दर्य दिसे न तोंच चिडुनी मदद्दष्टि हो निष्ठुर,
मी वेताळगिरीवरी भटकतों अस्पष्ट भूतासवें.
होऊ अन्धुक शुक्र, पूर्व ऊजळे, नादांत मी हिण्डतों
तों भासे चढणीवरी कुणि चढे श्वेताम्बरा आकृती;
होऊ धप्धप काळजांत, वळतां ऐका शिळेआड तों
काव्याची अधिदेवता जवळुनी जाऊ मनोज्ञद्युती.
नान्दे कर्पुरगौर गोल वदनीं सम्पन्नता, मान्यता;
राज्ञीवैभव, आणि शोधक तरी द्दष्टि स्वत: मोघम;
भाळीं कुङकुमबिन्दु ऊन्च बसुनी दावी सुखी आढयता,
मुक्तांचीच सुबद्ध पङक्ति विलसे जोष्ठीं गुलाबोपम.
मी प्रेमास तुझ्या अपात्र, मग कां हें आस लावी स्मित ?
मी भूतापरि तेथुनी निसटतां झालीस कां विस्मित ?
३० जुलै १९२२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP