तुटलेले दुवे - आली कृष्णचतुर्दशी, ढग नभ ...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
आली कृष्णचतुर्दशी, ढग नभ व्यापूनि हे टाकिती,
ऐन्द्राचा रथ चालला धडधडा की व्योमपन्थें गमे,
ये गेहास करूनि दिग्विजय की जुन्मत्त हो विक्रमें,
नाही वीज सुनील ही, फडफडे त्याची पताका किती !
कोठे पामर जीव भूवरिल हे येथे दिवे लाविती,
यांचें तेज चढूनि दीपविल का स्वर्ज्योतिंना त्या श्रमें ?
हीं पोरेंच, फटाकडे अडवुनी यांची जिगीषा शमे,
चन्द्रज्योतिच लावुनी दिपवुनी डोळ्यांस हे टाकिती.
माझें कार्य पुढील थाम्बवुनि मी बाहेर डोकावतां
चित्तांतूनि विचार हे चमकुनी जाती निघूनी त्वरें;
येती थेम्ब तशांत, काय गगनश्री अश्रु ढाळीच ही !
का माझी स्मृति होऊनी तुज सखे, मोदांत नादावतां
चिन्तेने म्हणतेस. घालविशि का तू दूर जीवित्व रे ?
देवी, दिव्य अशी स्मृति प्रकटतां माझी दिवाळीच ही !
२७ ऑक्टोबर १९३५
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP