तुटलेले दुवे - हौशीने फिरतां प्रदोषसमयीं...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
हौशीने फिरतां प्रदोषसमयीं वाडींत तू ऐकटी
केशारूढ तुझा गुलाब पडतां मागे पथीं खालती
देतां मूर्ति मदीय तें ऊचलुनी हातीं तुझ्या सादर
गे तूझी भुवऊ चढूनि न पडो आठी कपाळावर;
रात्रीं झोप न ये म्हणूनि बसतां ज्योत्स्नेंत सौधावरी
स्नप्नें जागृतिचीं पुढील तरतां नेत्रांपुढे धावरीं
ज्योत्स्नागीति विषण्ण ऊकुनि “अता पीडा कशी टाळुं ही !”
दारें आपुटनी चिडूनिच तुवां जावें न अन्तर्गृहीं;
सोनेरी पसरे ऊषास्मित, करीं ताजें ‘मनोरञ्जन’,
द्दष्टीला पडतां अनाम कविता ही ‘प्रेम का काञ्चन ?’
शङका येऊनि वाचुनी बघुनि ती रूक्ष स्वरें त्रासिक
‘जळळं तें !’ म्हणुनी झुगारुनि दुरी द्यावें न तें मासिक ;-
यसाठी, (न कळे तुला किति तुझ्या प्रीतीस मी अर्हित),
प्रेमाने मम मूर्तिगीतिकविता होतील अन्तर्हित.
२ जून १९२७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP