तुटलेले दुवे - वर्षें सत्तर लोटलीं, अजुन...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
वर्षें सत्तर लोटलीं, अजुनिही स्वातन्त्र्य रक्षावया
शस्त्रें घेऊनिया जुनाट अपुलीं ये ‘रास’ वेगें रणीं,
शत्रू फार सुसज्ज, शोधक नव्या साहयास विद्या तया,
कैचा हा टिकणें ? करी तरि बळें युद्धास अङगेजणी.
झालें कोसळला रणावर पहा झुन्जूनि सावेश हा,
त्याला देतिल बण्डखोर पदवी त्याचे अता बान्धव.
ये चैतन्य पुढे कधीतरि तदा घ्यातील यातें अहा !
हा निन्दास्तुतिच्या रिघे पलिकडे, मी खिन्न याच्यास्तव.
घे घेऊनि सुधारणासुख मला, सोयी तर्हेच्या किती !
वाटे हाय ! परन्तु हीन दुबळें ओशाळवाणें जिणें.
धोक्याचें पुरवेल कष्टद जिणें जे अफ्रिडी भोगिती -
वाटे स्त्रैणच हा सुशिक्षितपणा त्या क्षात्रतेजाविणें !
नेटाने असहाय रे झगडतां स्वत्वार्थ तू सङगरीं !
माझी वान्झ सहानुभूति, कुढतों मी माझिया पञ्जरीं.
२२ नोव्हेम्बर १९३७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP