मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
जावा होऊनि ऐकजीव अपुला का...

तुटलेले दुवे - जावा होऊनि ऐकजीव अपुला का...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


जावा होऊनि ऐकजीव अपुला कां को महाराष्ट्र न ?
साधाया शिवलोकसङग्रह पुणें तें ब्राम्हाणी पात्र न.
द्दष्टि प्रन्तिक ठेवण्यांत दिसतें राष्ट्रीयतेला भय -
व्हावा सिन्धच कां विभक्त ? पण तो स्वायत्ततेचा जय !
ऊर्दूचें परचक्र पैठणपुरीं कां ? राजभाषाच ती.
कां हो ती मग लश्करीं मिरविते ? वा ! कम्पुभाषाच ती.
क्रान्ति श्रीनगरींच कां विहित ती ? चिन्ता प्रजेची पडे.
कां ती श्रेष्ट न होय भाग्यनगरीं ? तेथे तहाने नडे.
खिस्ती आङग्ल कसा प्रवेश मिळवी जेथे ऊभा विठ्ठल ?
“ना विष्णु: पृथिवीपति:” प्रकट हें अन तो सदा मङगल.
चोखा कां न शिरूं शके ? प्रभु न तत्स्पर्शे ऊरे पावन !
पीराला नवशी कसा द्विज ? अहो, सर्वत्र नारायण !
घेणें पोटच जाळण्यास जर वा देणोंहि विद्यामृत
व्हावें ग्रान्थिक शिक्षणें हृदय हें तेव्हा कसें जागृत ?

२८ जून १९३२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP