मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
हो माझीच असें तुला विनविल...

तुटलेले दुवे - हो माझीच असें तुला विनविल...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


हो माझीच असें तुला विनविलें का मी मनें शुद्धट ?
घाली तो मजलाच हार म्हणुनी कां घातलें सडकट ?
राहूं देच अपारदर्शक अता दोघांत अन्त:पट,
न स्वाभाविक हा, असेंहि म्हण जा, प्रेमांतला पालट,
प्रीतीच्या धनसम्पदेंत भरुनी त्यागात्मता राहिली
देतां प्रीति मिळेच ती, स्थिति अशी कोणी कधी पाहिली ?
स्वार्थाची कुसुमाञ्जलि प्रिय हिला ती पाहिजे वाहिली,
कर्तव्याचरणीं मनास मग हो वा शान्ति वा काहिली.
तू मैनाच मनांतली म्हणुनि का कोण्डूं तुला पञ्जरीं ?
तू आहेस सदा स्वतन्त्र ललिते जा चारुतामञ्जरी.
माङगल्यप्रद माळ घाल कुणिही श्रेष्ठाचिया कन्धरीं.
होतां सूख तुला मला परतुनी पावेल तें अन्तरीं,
गे तू आणिक जो तुझा प्रिय असा - तो मित्र माझा जुना -
दोघांची नित पायकी करिन मी, संसार सारा सुना.

४ जानेवारी १९२३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP