तुटलेले दुवे - वस्तूंचें रुचिर प्रदर्शन ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
वस्तूंचें रुचिर प्रदर्शन बघूं, तेजी स्वदेशीस ये.
वारें खात खुल्या स्थळीं विहरुं या, व्यायाम होऊ स्वयें.
नेत्रांना तरि या क्षणैक रिझवूं, - श्रीमन्त का आपण ?
या हो ! कां असतां अनुत्सुक सदा ? का त्या स्थळीं काव्य न ?.
चाले वाद्यसमूहवादन ऊथे अन ऊल्लसे भावना,
घेऊनी अपुलीं मुलें मिरवती कौतूहलें अङगना -
कां हो व्यग्र तुम्ही ? प्रफुल्ल दिसतो बाजार साराच हा !
विश्रान्तिगृहही ऊथे, मग चला या घेऊं थोडा चला.
नक्षीची मधुगन्धि चौकट किती ही चन्दनी नाजुक !
वा ! वा ! दोन ! महाग फार ! रुपया ? घे रे ! असे ठाऊक.
ऊञ्ची कापड हें निळें तलम - का घामें न काखीं विटे ?
चोळ्यांना खपतें विशेष म्हणशी ? दे वार. अन हीं चिटें !.
नाही मीं म्हटलें बुवा तरि रिता झाला खिसा आणखी -
कां हो, त्या दुबळ्यास भीक रुपया ? विक्षिप्त हें दान की !
१९ सप्टेम्बर १९२७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP