तुटलेले दुवे - सृष्टिग्रन्थ अनन्त जो समज...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
सृष्टिग्रन्थ अनन्त जो समजुनी वाचूं बघे कौतुकें,
राज्यें जिडकुनि कीर्तिदुर्ग अथवा बान्धावया जो बघे.
जाती भङगुनि त्यापुढे सहज तीं स्त्रीभ्रुलताकार्मुकें,
वेळीं तो ललनेस खेळविल. ती स्वातन्त्र्य त्याचें न घे.
केलें कार्य विशेष काय जगिं तू प्रेमांत वाहावुनी ?
प्रेमाचीच सदान्कदा गुजकथा रेखाटिली कागदीं,
या विक्षिप्त तर्हेकडे रसिकही येतात का धावुनी ?
कोठे दाव कलाचमकृति तुझी या हस्व काव्यांमधी.
बाबा, चञ्चल राजनीति असते, लावण्यलक्ष्मी तशी;
काळालाहि न जें गणील वर तू काही असें अन्तरीं;
अन्त:श्रीच पहा खरी सहचरी, वर तू काही असें अन्तरीं;
अन्त:श्रीच पहा खरी सहचरी, रूपें नसो ऊर्वशी,
सोडी ही न कुणास भूवर, तया स्वर्गीं सवें ने वरी,
हाला जाण जणू हलाहल, पहा पाणीच हें जीवन -
स्वच्छीं मी मदिराक्षि, तूजच, जरी तापे सभोती रण.
१४ डिसेंबर १९२९
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP