तुटलेले दुवे - होतों वाचनमग्न आणि टिचकी ...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
होतों वाचनमग्न आणि टिचकी दारावरी वाजली,
“आहे कोण तिथे ?” म्हणूनि पुशिलें, येऊचना ऊत्तर.
“या या आंत खुशाल, दार ऊघडा, नाही कडी आंतुनी” -
कोणी तें ऊघडी न, आणि टिचकी दारीं पुन्हा वाजली.
गेलों त्रासुनि आणि ताड ऊठलें खुर्चीवरूनी तसा,
केलें दार खुलें. कुणीच न दिसे बाहेर, बाजूस तों -
कष्टाने निज हास्य आवरित तू चोराप्रमाणे ऊभी !
हास्यस्फोटच होय. बान्ध फुटुनी डोळ्यांत पाणी भरे.
तू मागे लपवूनि हात पुशिलें. “झाली कशी जम्मत ?
साङगा हो गणितज्ञ, काय लपलें हातांमघे आमुच्या.
साङगा रङग, कराच मान्य अथवा झाली फजीती असें.
नापासासहि येथ बक्षिस मिळे, घ्या गुल्छबूचीं फुलें.”
तो पेटीमधि मख्मली अजुनिहि निर्माल्य आहे बरें.
हीं आहेत फुलें तुझींच तुजला वाटेल का हें खरें ?
८ एप्रिल १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP