तुटलेले दुवे - सन्ध्या शान्त ऊदात्त सुन्...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
सन्ध्या शान्त ऊदात्त सुन्दर ! असें होऊल ना जीवित ?
गेला पूर गढूळ ओसरुनि तो, कालान्तरें पाहतां
येथे ओघ दुभङगती पण पुढे होतात हे मीलित,
मध्ये पाण्ढुर वाळवण्ट, अगदी ऐकान्त अन शान्तता.
प्रीतीला प्रिय फार जो वर नभीं तेजाळ तो दीप हा;
तेवेनाच परन्तु रात्रभर हा तार्यांतला अग्रणी,
वृक्षाग्रावर त्या फिकी चिमुकली तारा ध्रुवाची पहा,
ऐकाकी न तिचें स्वरूप भरतें कोणाचिया लोचनीं,
हें तूझें हिमशुभ्र पातळ सखे, आनील ती कञ्चुकी,
हे तेजाळ अथाङग नेत्र, वदनीं वर्णच्छटा पाटल,
तू सन्ध्याच जणू ! कुठूनि मग ही अस्वस्थता त्वन्मुखीं ?
वारे मेघ न येथ, कोठुनि बरें चित्तीं तुझ्या वादळ ?
बान्धूं त्या डगरीवरीच घर गे जेथे दिसे जङगल -
“तेथे ? काय असे अहो निखननस्थानांत त्या मङगल ?”
१६ ऑगस्ट १९२६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP