तुटलेले दुवे - “हृत्तीरावरती पुन्हा परतत...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
“हृत्तीरावरती पुन्हा परतती पूर्वील रम्य स्मृती.
स्त्रीला ठार करी विवाह न कळे हें केवि, आहां कवी ?
मी कैशी विसरेन ? नित्य तुमच्या पाहात आहें कृती,
तीच प्रेमळ का पुन:पुनरपी प्रेमास जी दाखवी ?”-
माझी चूक असेल ती विसर तू. या विस्मृतीच्या दिनीं
पूर्वीच ऐरलों नसेंच बघ मी रुग्णालयायामधे.
तू येऊंच नकोस सन्निध अता. प्रीती यशोदायिनी
दे वेळींच कुणास अन्य, न मला हेवा अता शारदे.
टाकूनी निज पाश गम्मत बघे तो मृत्युचा धीवर,
ही त्याचीच दया घटिद्वय जरी राहीन मी जीवनीं,
पुष्पें हीं बनल्यास येऊनि वहा आता समाधीवर,
होतां मृत्कण हे विकीर्ण न चले गे प्रीतिसञ्जीवनी.
ती मायाच मयासुरी पण किती गे हृद्य ती संसृती !
भासे सत्य असार रूक्ष मज हें, ही कासया जागृती ?
६ जानेवारी १९२७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP