तुटलेले दुवे - तेव्हा भेद मुलांमुलींत कु...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
तेव्हा भेद मुलांमुलींत कुठला ! ती मोकळी सङगत,
खेळाडूपण ऐक, त्याविण दुजा तेव्हा न ठावा गुण,
खेळायास भिडू कुरूपहि मिळो, खेळांत ये गम्मत;
वाटे अर्थ न “मोहिनी, शशिमुखी !” ग्रन्थान्तरीं वाचुन.
स्वप्नाळू नवतींतच प्रकट हो स्त्रीत्वप्रभामोहनी;
बाला रूपमती, ऊदात्तचरिता, श्रीशारदा तै गमे;
डोळ्यांतील अवर्ण्य गारुड, मुखाविर्भाव बिम्बे मनीं,
ध्येत प्रेय बघूनि ऐक युवक प्रेमीं भ्रमे विभ्रमें.
द्दष्टी आणिक ती चळे ऊसळतां तारुण्य कार्यक्षम,
तेव्हा और ऊभार तो ऊपजवी संवेदना नूतन,
श्रोणी पुष्ट, निमूळती हरिकटी, जङघोरु शुण्डोपम,
तेज:पुञ्ज मदालसा ! तिजसवें वाटे सुखा अन्त न.
अन्त:सुन्दरता पुढेच पटणें. ती ही असे का स्थळी?
कां संसार विचित्र फोल म्हणती ? मायाच का फाकली ?
१८ जुलै १९२२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP