तुटलेले दुवे - देवा, दुस्सह काय हाय दयित...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
देवा, दुस्सह काय हाय दयिताचाञ्चल्य हें राक्षसी !
जो मी शम्भर शत्रु येऊनि जरी माझ्यासवें झुन्जले,
ते घेवोत यथेच्छ सूड, लवडी न स्वत्व माझें ढळे -
त्या माझीच करी क्षणांत अबला ही आज दैना कशी !
पूर्वी तीव्र कटाक्ष मारुनि जरी ही नित्य विन्धी मशी,
तेव्हा मत्त पराक्रमोन्मुख करी, सामर्थ्य दे आगळें;
दुर्लक्षेंच अता हतप्रभ करी; येथील आशा गळे,
अन स्वर्गींहि, पुरूरख्यास ठकवी जी तीच ना ऊर्वशी ?
भासे चञ्चलताच मूर्त मजला स्त्रीजात ही तेवढी !
केला रङगित ऐक चित्रपट मीं रम्य प्रकाशीं तिच्या,
टाकी त्यावर ती स्फुलिङग, सहज क्रीडा पहा प्रीतिच्या !
मागे रङग करी कसा सजवुनी ती भावना बेगडी !
जाऊ ज्योतिमधे पतङग जळुनी, नाही दुजा लाभ रे !
आशेची बघण्यास राख मजला राखी प्रभू कां बरें ?
३० ऑगस्ट १९१३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP