तुटलेले दुवे - लाटा हासत लोळती, खिदळती, ...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
लाटा हासत लोळती, खिदळती, आलिङिगती, चुम्बिती;
सोन्याची क्षितिजावरी झळझळे कीं सिन्धुजा द्वारका ?
शोभे अर्ध विशाळ बिम्ब रविचें किंवा महाद्वार का ?
गेला रङगुनि तो मुलापरि दुरी, दिग दुक्ख तें दाविती.
आला सम्पत खेळ, वायु दमला खेळूनिया शीणतां,
लाटा पेङगत विस्मृतींमधि हळू जाती विरूनी सुखें;
कारञ्जें द्युतिचें पहा विरमलें, सृष्टी अता अन्धुके;
अन्धारासमवेत शान्ति पसरे का ही ऊदासीनता ?
येथे टेकुनि आपुली हनुवटी हा यष्टिटोकावरी
बैसे कोण शिलेवरी ? टक अता लावी कशाला दुरी ?
अन्धारांतुनि तारका कवण ती दे यास द्दङमाधुरी ?
याला काय समाधि लावुनि करी निष्चेष्ट चित्रापरी ?
वाजे पाऊल, तो बघे, झणि ऊठे, मी देखतां देखतां
जाऊ दूर तमांत तो मिसळुनी - मी राहिलों ऐकटा.
२१ फेब्रुवारी १९१४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP