तुटलेले दुवे - माझी ठेव निदान ओळख जुनी -...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
माझी ठेव निदान ओळख जुनी - मीत्री नसो आपुली !
याचें सङकट काय तूज पडलें ? मागीतलें काय मीं ?
पूर्वीची विनती न कां विसरशी ? ती आस होती खुळी;
‘सारें माफ !’ म्हणूनि पाहुनि मला होशी कां श्रमी !
गौरी होतिस तेधवा. अजुनिही हो त्या तुझा आठव,
मूर्ती रम्य झग्यांतली चिमखडी, आवाज तो कोवळा,
ती सागत्य धिटाऊची चवकशी, तें मञ्जु वाक्पाटव,
अन अव्याज शिशुस्वभाव हसरा, ओढाळ अन मोकळा.
होती त्या क्षणिं सावली पदतलीं, बागेंत तूझें गृह,
“तुम्हां कोण हवें ? न ते घरिं, कुठे साङगूं ? चला दावितें.”
मागे सारित केस, येऊनि ऊन्हामध्येहि तू साग्रह
पत्ता साङिगतला खुणावुनि दिशा, “जा जा असे त्या तिथे.”
अन आता बघशी न तू विसरुनी जाणों जुनी ओळख,
ती माझ्या मन - कर्णिकेमधि असे की शुद्ध गङगोदक !
१४ सप्टेम्बर १९२२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP