तुटलेले दुवे - वाटेना कविता लिहीत असतां ...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
वाटेना कविता लिहीत असतां काहीच, ती सम्पतां
जीवाला हलकें गमे, सुख नवें लाभे पुवर्वाचनीं,
कच्चें मुद्रित शोधण्यांत सहजीं थोडे न होती श्रम.
हातीं पुस्तक बान्धलें बघुनि हें झालें गमे सार्थक.
हें हातीं धरिशील काय पण तू ? तेव्हा तुझ्या हृत्सरीं
आवेगें अठतील काय लहरी ? वाटे मला काळजी,
“हा माझा कवि, काय मोहक लिही !” देशील शेरा असा
का “भाषा अगदी असंस्कृत किती ! काही चमत्कार न !”
चित्रग्रन्थ जयांत मी निजमन:सृष्टी असे चित्रिली.
लोकांच्या हृदयीं बसेल ठ्सुनी आशा अशी वाटते.
ओवाळूनि तुझ्यावरूनि पण हा दीपाप्रमाणे दिला
मी सोडून बुडो तरो डुलत वा हा लोकगङगेवर.
काव्यीं सुन्दरता रुचे तुज, न कां काव्याहुनी जीवन !
तें होऊल विशेष हृद्य असतां सौन्दर्यभोजी मन,
१८ ऑगस्ट १९२६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP