तुटलेले दुवे - जातांना रमणीय या सुवसना म...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
जातांना रमणीय या सुवसना मी जों पाहतों
जाऊ होऊनि खोल दुस्सह असा माझ्या मनीं दाह तों;
आत्मतृप्त, ऊषारुणोल्लसित या चन्द्रप्रभाशीतल,
यांच्या केवळ दर्शनें तपनवत कां होय ऊर्वीतल ?
माझी होय अशी स्थिती कठिण ही वर्णूनि साङगूं कुणा ?
घावांच्या ऊघडूनि अन्तर अता कोणास दावूं खुणा ?
कोणी अर्थ ऊथे करील भलता - ‘जी - तीवरी हा भुले ‘;
कां वाटे अवधूत मी जगिं असें ? बोलूं कुणाला खुलें ?
घेशी तू न सहानुभूति धरुनी भक्तास या सन्निध.
देती यास्तव ताप या विधुमुखी जीवास नानाविध.
आहे सुन्दर शारदा जगिं अता माझी मला वाटुं दे,
मी जाऊन बघूनि यांस पुढुणी औटींत माझ्या मुदें.
आता होय परन्तु यांस बघतां घे पेट अन्त:क्षुधा,
अन हीतें शमवील ऐकच तुझी दुष्प्राष्य ती द्दक्युधा.
२८ ऑक्टोबर १९३२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP