तुटलेले दुवे - आहे देश सुधारला किति पहा ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
आहे देश सुधारला किति पहा आता नव्या शिक्षणें !
घेतों सुन्दर वेष्टनांतिल किती पाश्चात्य हीं औषधें !
यन्त्रें मागवितों नृसाहयकर हीं, हीं सोयिचीं वाहनें -
तैशीं नूतन दर्शनें बघुनि जीं झिङगूनि जातों मदें,
आम्ही वेष करूनि जो मिरवितों श्रीमन्त ई संस्कृती,
तो ज्यांनी विणिला तयांस धडुतें लाभो न अङगावरी;
पक्वान्नें पचवावयास ऐकडे क्षारादिकें लागती,
शेतीं कष्टुनि धान्य जेपिकविती ते अर्धपोटी परी -
या देशांत असे असङख्य खपती दैन्याचिया रौरवीं,
आम्ही त्यांजकडे कशास बघतों की क्षुद्र ते कीटक !
आम्ही तों अमुच्यामधेच् रमतां सङगोपितों यादवी -
घेतों नेत्र सुखें भिटूनिच जरी तो काळ लावी टक.
पाही कोण कुठूनि ये हिरवळीखालून गूढ स्वर !
नाचा ! काय तळीं कढे बघुं नका, आयू असे नश्वर !
१८ डिसेम्बर १९३७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP