तुटलेले दुवे - धागा जाय तुटूनि, काय नच य...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
धागा जाय तुटूनि, काय नच ये जोडावया तो पुन्हा ?
गेला स्नेह सुकूनि, पार ? कथिती हीं तूज बाष्पें मुकीं
की पाहूनि तुझ्या सुखास अजुनी हा जीव होऊ सुखी.
गेला मत्सर राग वा घडिभरी राहूनि तो पाहुणा.
आता केवि करूनि देऊं तुज मी माझी नवी ओळख ?
तू पौरन्ध्रिक वैभवांत अपुल्या नादांत जाशी दुरी,
सङगें ही प्रतिमा तुझीच चिमणी खेळाडु गोरी भुरी,
मी बाजूस ऊभा, गमे तुज जणू प्राणी कुणी क्षुल्लक.
हो दुर्लक्ष तुझें परन्तु जनता जिज्ञासु थोडी नसे,
श्यामा चन्द्रमुखी कुणी गजगती ये खावयाला हवा,
हीतें पाहुनि शिष्ट काय करिती सम्भावना वाहवा !
वाटे यांस कुटाळकींतच दिसे कौशल्य, गोडी वसे.
माझें तोण्ड मिटूनि घट्ट परि मी घेऊ, खुलेना कुणा,
साङगे गोष्ट कुणी कशी जुळवुनी ऐकीव खाणाखुणा.
१९ मार्च १९२३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP