तुटलेले दुवे - देऊ सिञ्चुनि आपुलें रुधिर...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
देऊ सिञ्चुनि आपुलें रुधिर जो राष्ट्रास सञ्जीवन,
कण्ठी जीवित शान्तिहीन खपुनी घोरांमधे भीषण,
त्याचें भङगुनि राष्ट्र जात असतां त्याच्याच का वंशजें
व्हावेम मत्त सुखासवें ? मन कसें त्या पामराला भजे ?
अज्ञानांत असंस्कृतींत पडले त्यां शुद्धरूं या चला
यासाठी वनवास पत्करुनि जो फेकूं प्रभा लागला,
श्रीश्वर्याकुल आज तत्प्रतिनिधी लक्षी प्रकाशास न ?
त्याचें वन्द्य कुठूनि राहिल जरी प्राचीन धर्मासन ?
गेलें का अमुचें कृतज्ञपण तें सारें लयाला जुनें
ज्याच्यावीण जिणेंहि केवळ कसें वाटे जिवाला सुनें ?
चाले जें कलहात्मजीवित परी चोहीकडे भूवरी
राष्ट्रीयत्व तयामध्ये झगडुनी जीवन्त ठेवूं तरी
स्वातन्त्र्यांत मिळेल भाकर सुखें सर्वांस सेवायला -
ओवाळीन जिवास त्यावरुनि मी राष्ट्रार्थ जो भागला.
२७ जून १९३३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP