तुटलेले दुवे - होतों मित्र न राहिलों पण ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
होतों मित्र न राहिलों पण अता ही काय शिक्षा कमी
की आडूनि सुरुङग तू ऊडविशी ? व्हावेंच का राख मी ?
झालों मी मृततुल्या जीव असुनी मैत्री निमाली यदा,
मेल्याला करण्यांत वार बघशी तू कोणता फायदा ?
काटेरी शयनीं पडूनि असतां कोणी मनूचा सुत
दावी गोड सहानुभूति मजला पाजूनि शब्दामृत,
हें तूतें नच पाहवे, सुख तुझ्या सेवेस राही खडें,
कां देशी विषधूर सोडुनि असा अव्यक्त चोहीकडे ?
माझ्या जीर्ण हताश भग्न ह्र्दयीं अद्यापि तें पूर्विल
मित्रप्रेमरहस्य गुप्त अपुलें आहे, पुढे राहिल:
मेल्यावांचुनि मी सुरक्षित न तें - हें तूज टोची भय,
अन राहील तुझ्या अखोल हृदयीं ? वाटे मला विस्मय.
दुर्दैवें करणी तुझी तुज अता काही कळेना मुळी:
तूतें देव करो क्षमा जरि मला घाऊंत देशी सुळीं.
३० एप्रिल १९२४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP