तुटलेले दुवे - द्दष्टीआड न होय वस्तु न क...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
द्दष्टीआड न होय वस्तु न कधी जाऊ मनाआड जी,
माझ्या स्वानुभवास हें न पटतें, वाटे परी काळजी,
की माझ्या ‘प्रिय’ वर, तळीं ‘स्नेही तुझा प्रेमळ’
पत्रीं शब्द असे मला न दिसले, गेलीं दिनें पुष्कळ.
माझा ऐक गरीब मित्र दिवसां कष्टूनि अघ्यापनीं
रात्रीं नाम मदीय घे न चुकतां, सप्रेम चिन्ती मनीं,
केव्हाही असला विचार तुझिया चित्ता शिवे काय रे ?
मित्रा, जीव तदा तुझा गतसुखस्वप्नीं निवे काय रे ?
का गट्टी जुळली तशी निखळली विद्यार्थिकालातली !
शङका ऊद्भवतांच हीं बघ जळें डोळ्यांमधे दाटलीं;
मैत्री शक्य नसे नवीन जड्णें जातां सुखी शैशब,
मी कञ्जूष ऐरीं अता दडवुनी ठेवीं जुनें वैभव,
दुर्भाग्यांत अनाथमायकलिजा जाणें - नको द्दश्य तें !
हा हृद्भङग कशास ? याहुनि बरें निष्प्रेम आयुष्य तें.
४ जुलै १९१९
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP