तुटलेले दुवे - विद्युद्दीप पथ प्रकाशित क...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
विद्युद्दीप पथ प्रकाशित करी तेजाळतां भार्गव,
मी सज्जांत ऊभा धरूनि कठडा, चौकांत डोकावुनी
होतों लक्षित अन्धकार, खवळे चित्तांत चिन्तार्णव,
दैवाच्या थपडा वयांत पहिल्या नानापरी खाऊनी,
होणें शक्य न तोण्ड - ओळख तदा अस्पष्ट ऐकिलें,
“आहे कोण तिथे ? परन्तु न दिलें प्रन्नास मीं ऊत्तर.
थोडीशी वळवूनि मान अपुली मागे कुठे पाहिलें
छाया, मूर्ति दिसे कुणी जवळ तों, ये ओळखीचा स्वर.
“वेडया, मी परतन्त्र; कां वळविशी तेथेपणें तू मुख ?
ये, तूतें निमिषैक मी जवळ घे, कष्टूं नको वा रुसूं.
आशेला जगवावयास वरूषें घे हें क्षणाचें सुख,
भेटूं अन्य कुठे, जुनी स्मृति तदा हर्षासवांनी पुसूं.”
छाया जाय दुरी करूनि मजला तन्द्रींतुनी जागृत,
लोटे स्वप्नसुखास त्या युग जणू - आशा द्से ही मृत.
२१ सप्टेम्बर १९२२
Last Updated : November 11, 2016
TOP