मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
मैत्री ही मज आज सान्त दिस...

तुटलेले दुवे - मैत्री ही मज आज सान्त दिस...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


मैत्री ही मज आज सान्त दिसते जैशा जगीं वस्तु या,
अट्टाहास करूनि मी दिन किती वांचेल ही यापुढे ?
मीही क्षीण पडें रुतूनि हृदयीं लाखों विषारी सुया,
येऊल क्षण तोहि, शान्त पडुनी जाऊल हें बापुडें,
होता तो मधुकाळ आणि म्हटलें नादावुनी आपण
“मैत्रीविक्रम दाखवूनि जगतीं डङका यशाच पिटूं ”-
कीर्तींचा पडसाद ये श्रुतिपथीं, मैत्री न आता पण,
जावो ती ? सुखरूप धन्यच जगीं आहेस अद्यापि तू,
गेलें सर्व ढगाळुनी नभ वरी, फुन्जे फुगोनी नदी,
गेले अन्धुकुनी दुरील गिरि ते, झिमझीम वर्षा पडे,
सन्ध्या होय समाधिशान्त भवती, रन्जे बघोनी न धी,
जाऊं मी स्थळ सोडुनी प्रिय असें कोठे नि कोणाकडे ?
वेशीच्या जवळी परन्तु दुरुनी वन्दुनि जातां तुज
मैत्री बाळपणांतली स्मरुनि घे हें ऐक भावाम्बुज.

२८ जुलै १९२६

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP