मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
एकसष्टावी करुनी , वंदिले ...

मानसगीत सरोवर - एकसष्टावी करुनी , वंदिले ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


एकसष्टावी करुनी, वंदिले शंकर ॥ काय ही किंकर, गाई तुज ॥६१॥

बासष्टावी केली, जोडिते मी हात ॥ तूचि माझा तात, हेचि सत्य ॥६२॥

त्रेसष्टावी करुनी, जोडिले म्या पाणी ॥ असे तुझी राणी, माय माझी ॥६३॥

चवसष्टावी करुनी, पाहिले त्वद्भात्र ॥ असे तुजा पुत्र,बंधू माझा ॥६४॥

पासष्टावी करुनी, वंदी सदाशिव ॥ आनंदला जीव, पाहुनिया ॥६५॥

सासष्टावी केली, तुज उमाकांत ॥ करी माझा शांत अहंकार ॥६६॥

केली प्रदक्षिणा, सदुसष्टावी शिवा ॥ सापडला ठेवा, पूर्व पुण्ये ॥६७॥

अडसष्टावी केली, प्रदक्षिना आता ॥ तुज विश्वनाथा, विनवीते ॥६८॥

एकुणसत्तरावी, झाली माझी फेरी ॥ राहो मदनारी, चित्ती माझ्या ॥६९॥

प्रदक्षिणा भावे, केली सत्तरावी ॥ दिगंबरा द्यवी, भेट आता ॥७०॥

एकाहत्तरावी, भावे केली रुद्रा ॥ वासना अभद्रा, हरि माझ्या ॥७१॥

बाहत्तरावी प्रेमे, प्रदक्षिणा केली ॥ होवो चंद्रमौळी, समर्पण ॥७२॥

त्र्याहत्तरावी फेरी, माझी नीळकंठा ॥ वाटे देव मोठा, हाचि मज ॥७३॥

चवर्‍याहत्तरावी, केली गंगाधरा ॥ दैवत माहेरा, हेचि असे ॥७४॥

पंचाहत्तरावी, जगसंहारकासी ॥ मज अर्भकास, ज्ञान देई ॥७५॥

माझी प्रदक्षिना, शाहत्तरावी झाली ॥ अवचित आली, स्फूर्ती मज ॥७६॥

सत्याहत्तरावी, केली उमापती ॥ होत माझ्या चित्ती, बहू हर्ष ॥७७॥

अठ्याहत्तरावी, धरुनी मी मौना ॥ करि प्रदक्षिणा, पंचवदना ॥७८॥

पशुपतीस केली, एकूणऐशीवी ॥ मूर्ति ती वसावी, ह्रदयी माझ्या ॥७९॥

ऐशीवी करुनी, रामप्राणमित्रा ॥ जपी शिवस्तोत्रा, कृष्णा सदा ॥८०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 31, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP