मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
दिनराति न ये मज निद्रा घे...

मानसगीत सरोवर - दिनराति न ये मज निद्रा घे...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


दिनराति न ये मज निद्रा घे धाव गुरूमाउली ॥

मी चकोर अससि तू चंद्रमुखी ज्ञानसुधा मज घाली ॥धृ०॥

व्यापिले मला ज्वरकामे वासना सरदि बहु झाली ॥

खळबळे पित्त क्रोधाचे दुर्बुद्धि घेरि मज अली ॥

गांजिले बहात्तर रोगी वैद्यराज औषधी घाली ॥

तिडकते अंग बहु माझे नसे जवळि कोणि ह्या काळी ॥दिन०॥२॥

स्वर ऐकुनि मद्विनतीचा, धावली सद्गुरू मूर्ति ॥

लाउनी अंतरी चक्षू परीक्षा नाडिची घेती ॥

रामनाम रस वल्लीचा काढूनि मुखी मम ओती ॥

हारिले बहात्तर रोगा पळ काढि वासना भ्रांती ॥

सतबोध शिरुनि अंतरी वैराग्य पातले शांती ॥

स्वानंद सागरी मजला सद्गुरू स्नान घालिती ॥

निर्मळ जाहली काया, शिरि करा प्रेमे ठेवीती ॥

सांगुनी पथ्य पापाचे अदृश्य होति तत्काळी ॥दिन०॥२॥

काय सांगु सौख्य पुष्टीचे रामनामि मत्त बहु झाले ॥

मन पवन करुनिया वारू एकांत वनाप्रति गेले ॥

सांडूनि अवस्था चारी त्रिगुणासी जावुनि पातले ॥

मारुनी लाथ मुक्तीते स्वरूपी मुदित मि झाले ॥

नाहि ज्ञान परी सद्गुरू हे मज रक्षिति संकट काळी ॥

ही कृष्णा नामौषह घे गुरुराजपदी नत झाली ॥दिन०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP