मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
अरसिक किति ही काया ॥ का...

मानसगीत सरोवर - अरसिक किति ही काया ॥ का...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


अरसिक किति ही काया ॥ का दवडिसी मूढा घडि घाड वाया ॥धृ०॥

नरतनु दैवे मिळाली ॥ लक्ष चौर्‍याशी योनी फिरुनी आली ॥

बहु पुण्ये तुज सापडली ॥ ऐसी अपूर्व नरतनु त्वा घालविली ॥

जन्मूनि जननी श्रमविली ॥

नाही प्रभुपदी तव मती कैसी रमली ॥अर०॥१॥

बाळदशा ही सारी ॥ गेली हा हा म्हणता खेळ-कुसरी ॥

तारुण्यमद हा भारी ॥

जासी मोहुनी स्त्री-पुत्र धन संसारी ॥अर०॥२॥

वेश्येपरि माया नारी ॥

थै थै नाचते तव देहपुरी ॥ षड्रिपु हे तुझे वैरी ॥

घेरा देऊनि वेढिती तव काया सारी ॥

विवेका धरी अंतरि ॥

वैराग्यशस्त्रे त्या तू निवारी ॥अर०॥३॥

सुबुद्धि सुंदर जाया ॥

तिच्या संगे राहे तू मनोराया ॥

शरण जा सद्गुरुपाया ॥

हस्त ठेवूनी मस्तकी उद्धरील काया ॥

विमान ये बैसाया ॥ आशा ठेवुनी कृष्णा रत गुरुपाया ॥ अर०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 31, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP