घडि भरे तरि राधे हरी नेइ मंदिरी ॥ नेइ मंदिरी ॥धृ०॥
देई खावयास द्राक्ष जांब अंजिरास ॥
राहिना हा धरितो श्वास, झालि खास दृष्ट यास, काय करू तरी ॥काय०॥घडि०॥१॥
राहिना हा यादवेंद्र, खेळावया मागे चंद्र ॥
दृष्टावला गुणसमुद्र, असा कोणि चतुर आण पंच-अक्षरी ॥घ०॥२॥
राहिना हा कमलनयन, करीना हा रात्रि-शयन ॥
दावि म्हणे राधाभुवन, नको अंत पाहु अता, घेइ कडेवरी ॥घे०॥घ०॥३॥
राधा-कृष्ण मायबाप, दावि शीघ्र तव प्रताप ॥
हरी जन्म मरण ताप ॥
बघुनि भवा झालि असे कृष्णा घाबरी ॥घ०॥५॥