मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
कुणाचा तू अससि दूत कोण धन...

मानसगीत सरोवर - कुणाचा तू अससि दूत कोण धन...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


कुणाचा तू अससि दूत कोण धनि तुझा ॥

सांग तुझी जननितात पुसत जनकजा ॥धृ०॥

करिसि गान मधुर तान मान लावुनी ॥

वृक्षाग्री रामनाम उमटतो ध्वनी ॥

झालि धन्य जननि तुझी तुजसि प्रसवुनी ॥

गुप्त कौपिनादि कटी लंब पुच्छ ज्या ॥कुणाचा०॥१॥

माते ऐक साद्यंत हि सांगतो कथा ॥

अंजनि मम जननि असे वायु मम पिता ॥

नाम हनूमंत करितो रामदास्यता ॥

पाठविले शोधास्तव जानकी तुझ्या ॥कुणाचा०॥२॥

गुप्त खूण काय दिली सांग कपिवरा ॥

करिति वास रामशेष कोणत्या पुरा ॥

शब्दशरे ताडियले व्यर्थ मी दिरा ॥

तेचि पाप भोगविले भरत अग्रजा ॥कुणाचा०॥

मुद्रिकेचि खूण देत जानकीकरी ॥

वल्कले तुज नेसविली कैकयीघरी ॥

हर्षभरित होय मनी जनककूसरी ॥

मारुनिया रावणासि घेउनि मजसि जा ॥कुणाचा०॥३॥

आज्ञा मज दिधलि नसे तुजसि न्यावया ॥

राम करे मृत्यु मयासूरजावया ॥

देइ आज्ञा जावयासि राम पहावया ॥

सिंधुतिरी अणिन उद्या दशरथात्मजा ॥कुणाचा०॥४॥

नच शंका रघुराया तुजसि प्रार्थिते ॥

तुजविण मज जग सार शून्य भासते ॥

तन मन धन अर्पुनिया शीर लवविते ॥

दृढ निश्चय कृष्णेचा भाव ना दुजा ॥कुणाचा०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP