मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
आरती हरिताळिके ॥ करितो ...

मानसगीत सरोवर - आरती हरिताळिके ॥ करितो ...


भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


आरती हरिताळिके ॥
करितो तुजला अम्हि अंबिके ॥धृ०॥
या रत्‍न वाटी ह्या ज्ञानवाती ॥
उजळुनी तुजला करु पंचारती ॥
नच घाली मज मृत्युमुखे ॥
चुकवि चौर्‍याशी मम जन्मदुःखे ॥आर०॥१॥
देई अह्मा तू सतत सौभाग्या ॥
संतत संपत दे आरोग्या ॥
संचित जाळी पातके ॥
हे गौरी आमुची विनवणी ऐके ॥आर०॥२॥
नच मंत्र येती नच क्रिया शक्ति ॥
परि माझी आहे अति अल्प भक्ती ॥
का माता टाकी बालके ॥
वेडीविदरी असली तरि राखे ॥आर०॥३॥
न्हाऊनी माखुनी शृंगार केला ॥
पिवळा पीतांबर नेसवु तुजला ॥
कुसुमेही भरली तबके ॥
म्हणे कृष्णा हो तुष्ट भक्ततारिके ॥आर०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 12, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP