मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
रे मनुजा आवर सदा रसना ॥ ...

मानसगीत सरोवर - रे मनुजा आवर सदा रसना ॥ ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


रे मनुजा आवर सदा रसना ॥

आवर सदा रसना ॥धृ०॥

ह्या जिव्हेने ताळ सोडिला ॥

सन्मार्गाचा मार्ग मोडिला ॥

धन-सुत गृहिचा स्नेह तोडिला ॥

पडुनि विषय व्यसना ॥रे मनु०॥१॥

मिष्टान्नाते सोडुनि देई ॥

मिळेल माध्यान्ही ते खाई ॥

अखंड नामामृत हे घेई ॥

कर इंद्रियदमना ॥रे मनु०॥२॥

चंदनापरि त्वा नित्य झिजावे ॥

देव-गुरूसी सतत भजावे ॥

अखंड साधू संत पुजावे ॥

भाव धरी भजना ॥रे मनु०॥३॥

इंद्रियगणि ही श्रेष्ठ धरिली ॥

जिंकी त्याची वासना हरिली ॥

चिद्‌घनरूपी वृत्ती मुरली ॥

त्यासी नमी कृष्णा ॥रे मनु०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP