मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
का मजवरि केलि तुम्ही अवकृ...

मानसगीत सरोवर - का मजवरि केलि तुम्ही अवकृ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


का मजवरि केलि तुम्ही अवकृपा शिवा ॥

भवचक्री घालुनिया फिरविले जिवा ॥धृ०॥

काय कथू मम काहणी प्रतिदिनी तुला ॥

नाहि सौख्य संसारी जाच बहु मला ॥

सदय ह्रदय करुनि राखि ब्रिदा आपुल्या ॥

मौन्य धरुनि कौतुक हे बघसि येधवा ॥का०॥१॥

नष्ट अहंकार मना गांजितो अती ॥

दुष्ट वासनाहि मला व्यर्थ झोंबती ॥

मायेने भ्रमत असे तोडि शीघ्र ती ॥

काम-क्रोध-काक कसे करिति कवकवा ॥का०॥२॥

काहि कळत सुचत नसे दीन लेकरा ॥

जननि-जनक तूचि मला एक आसरा ॥

पुरवि हट्ट कृष्णेचा बसुनि अंतरा ॥

तव गुणास गावयास साह्य करि भवा का०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP