मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
श्री विघ्नहरा करुनि त्वरा...

मानसगीत सरोवर - श्री विघ्नहरा करुनि त्वरा...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


श्री विघ्नहरा करुनि त्वरा भेट सुरवरा ॥

ओवाळिते पंचारति भुवनसुंदरा ॥ध्रु॥

प्रार्थिले मी प्रारंभी, शिवसुता तुला ॥

तव अगणित गुण गावयास बुद्धि दे मला ॥

या समयी ब्रह्मकुमरि तशा अष्ट सिद्धिला ॥

या संगे घेउन तुम्ही साह्य मज करा ॥श्री०॥१॥

मम देहताटि पंचप्राणदीप ठेविले ॥

आयुष्यवात ज्ञानघृतासहित उजळिले ॥

त्यजुनि पंच विषय त्रिगुण षड्रिपू भले ॥

अज्ञाना जाळुनिया उजळि कर्पुरा ॥श्री०॥२॥

सद्भक्तिखाद्य नैवेद्यहि तुजसि अर्पिते ॥

त्रयोदश गुणितचि तांबूल तो प्रेमे ठेविते ॥

अहंभाव सोडुनिया शीर लवविते ॥

शोधियले सकल भुवन सुख नसे जरा ॥श्री०॥३॥

या संसारी धरिली बहू अविट ती आशा ॥

तुजविण निस्तरिल कोन स्वजन दुर्दशा ॥

म्हणुनि आस धरिलि कास श्रीगणाधिशा ॥

नमि कृष्णाबाई तुला, अभय दे वरा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 29, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP