मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
देह भाजन होइल हे चूर , ने...

मानसगीत सरोवर - देह भाजन होइल हे चूर , ने...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


देह भाजन होइल हे चूर, नेइल यम शूर, मनुजा तुजसी ॥

होतील स्व्जन हे दूर भूमिवरि पडसी ॥

जाशील मातिला मिळुन, येति गृहि पळुन, वायुसम भ्रमसी ॥

चौर्‍यांशी लक्ष योनिचे फेरे का फिरसी ॥

तू हो सावध अंतरी, भाव मनि धरी, शरण जा गुरुसी ॥

उतरील भवाचा पार परतिरा जासी ॥

होईल पताका नाश, चुके यमपाश, भवार्णव तरसी ॥

करि नरा नवविधा भक्ति धरी दृढ हरिसी ॥धृ०॥१॥

नाहि बधिर अंध पांगळा नससि तू मुका ॥

का होसि पराधिन नरा बाइलिस एका ॥

नउ मास, पाळिले त्यास, दिली तू भाका ॥

फसऊनि तयासी कुठे जातोसी मुर्खा ॥

नाहि वाट, पडे मग गाठ, यमाच्या लोका ॥

सुविचार करुनि अंतरी चुकवि हा धोका ॥

अगणित कष्ट सोशिता लाभ नरतनुसी ॥करि०॥२॥

हरिलीला करी तू श्रवण, मानसी मनन, निजध्यासासी ॥

हरितनू नयनि बघ, करी भजन रसनेसी ॥

जा निजध्यासासी ॥

हरितनू नयनि बघ, करी भजन रसनेसी ॥

जा चरणि देउळी, करे पूजि तू प्रभुसी ॥

निर्माल्य सेउनी घ्राण लावि कार्यासी ॥

सत्संग राहे गुरुपदी दास्यसख्यासी ॥

नव भक्ती करूनी साधि सदा मोक्षासी ॥

ही कृष्णा वंदुनि नित्य रामचरणासी ॥

प्रार्थिते पाप हर, चुकवि जन्ममरणासी ॥होईल०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP