मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
अक्रूरा नेउ नको राम -श्री...

मानसगीत सरोवर - अक्रूरा नेउ नको राम -श्री...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


अक्रूरा नेउ नको राम-श्रीहरी ॥

राम-श्रीहरी, नको राम-श्रीहरी ॥धृ०॥

चिमणि काठि घेउनि करी धेनु नेतसे ॥

चिमणि मूर्ति, चिमणे गोप, संगे घेतसे ॥

चिमणि मुरलि कुंजवनी वाजवीतसे ॥

देउ कुणा नवनित मी दूध केशरी ॥अ०॥१॥

नंद यशोदेसी शोक नावरे जरा ॥

अक्रूरा क्रूरमती अससि तू खरा ॥

रथि घालुनि नेसि जरी राम-श्रीधरा ॥

तरि लोटुनि जासि आम्हा शोकसागरी ॥अ०॥२॥

नंद अंगणात गोपि करिति गर्जना ॥

दीन होउनि अक्रुरास करिति प्रार्थना ॥

रामकृष्ण भिक्षादान देइ या धना ॥

साठवि तू पदरि पुण्य घेइ यश शिरी ॥अ०॥३॥

तू तरि बघे करुनि कृपा नंदबालका ॥

ह्रदय पिटुनि व्रजांगना फोडिती हाका ॥

या समई ह्रदय असे कठिन करिसि का ॥

मनमोहना काळ कसा कंठु अम्हि तरी ॥अ०॥४॥

तुजवाचुनि विवल अम्ही श्यामसुंदरा ॥

कमलाक्षा ओस दिसे तुजविणे धरा ॥

सोसेना तव वियोग अस्मदंतरा ॥

त्या-समान कृष्णेची जाहली परी ॥अ०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP