मागू शाश्वत सौभाग्याप्रति गौरीला ॥
उजळूं पंचारति तिजला ॥धृ०॥
जमु सगळ्याजणि एक स्थळी ॥
सात्विक वृत्ती आणुन चित्ती आसनि करु स्थित ॥मा०॥१॥
श्रावण मंगळवारि हिला ॥
घालू स्नाना भरजरि वसना ॥
कंचुकि मौक्तिक ॥मा०॥२॥
पंचामृते ते पूजन करू ॥
कुंकुम-अभिरा शेंदुर-बुका ॥
वाहू अक्षत ॥मा०॥३॥
नेत्री अंजन घालु अधी ॥
कंठी भूषण हाती कंकण ॥
नासीकी नथ ॥ मागू०॥४॥
षोडशपरिची पत्रि अणू ॥
खाज्या करंज्या ॥
जिलब्या ताज्या ॥
नैवेद्याप्रति ॥मा०॥५॥
जन्मांतरचे दुःख हरी ॥ जाऊ शरणा ॥
दृढ धरू चरणा ॥ कृष्णेसमवेत मा० ॥६॥