अजुनि तारि नरा करी सुविचार ॥
त्यागुनि दुष्ट विचार ॥अजु०॥धृ०॥
आयुष्य सारे पळ पळ गेले ॥
गर्दभापरि व्यर्थ जाहले ॥
मृत्यु जरी करि ठार ॥अजु०॥१॥
कामा झाडी क्रोधा तोडी ॥
अहंकार तो उलथुनि पाडी ॥
देउ नको त्या थार ॥अजु०॥२॥
अज्ञानाचे भस्म करावे ॥
ज्ञानस्वरूपी मन विचरावे ॥
सोडुनि माया नार ॥अजु०॥३॥
लक्षचौर्याशी फिरुनी आला ॥
दुर्लभ नरतनु ब्राह्मण झाला ॥
पशुसम करि व्यवहार ॥अजु०॥४॥
भव हा अपुला व्यर्थ न जावा ॥
म्हणुनी कृष्णा प्रार्थी देवा नमुनी वारंवार ॥अजु०॥५॥