मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
एकविसावी केली , करवीर क्ष...

मानसगीत सरोवर - एकविसावी केली , करवीर क्ष...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


एकविसावी केली, करवीर क्षेत्री ॥ पाहिली म्या नेत्री अंबाबाई ॥२१॥

बाविसावी केली करवीरवासिनी ॥ नमिते विष्णुपत्नी, वारंवार ॥२२॥

तेविसावी केली, तुज आदिमाये ॥ दावी मज पाये, आधी तुझे ॥२३॥

चोविसावी करुनी, आले लोटांगणी ॥ पुरेना ती धणी पाहायासी ॥२४॥

पंचवीसावी केली, देवीच्या देव्हारा ॥ सासरा माहेरा, सुखी ठेवि ॥२५॥

सव्विसावी करुनी, उभी अंबेपुढे ॥ मागतसे चूडे, अक्षयीचे ॥२६॥

सत्ताविसावी केली, वाहते फूलपत्रा ॥ मम मंगळसूत्रा, आयुष्य दे ॥२७॥

अठ्ठाविसावी केली, चरणी ठेवी माथा ॥ मम कुळ गोता, दुःख नसो ॥२८॥

केली प्रदक्षिणा. एकोणतिसावी तुज ॥ आदिमाये मज, उद्धरी तू ॥२९॥

तिसावी करूनी उजळिते पोत ॥ सर्व गणगोत, तूचि माझे ॥३०॥

एक्तिसावी करुनी, करिते प्रार्थना ॥ पुरवी तू वासना, सर्व माझ्या ॥३१॥

बत्तिसावी करुनी, बत्तिशीचा दिवा ॥ सौभाग्याचा ठेवा, वाढो माझा ॥३२॥

तेहतिसावी करुनी, आहे हे मागणे ॥ कुंकवाचे लेणे, नित्य देई ॥३३॥

चवतिसावी करुन, जोडिते मी कर ॥ सेवा निरंतर घडो तुझी ॥३४॥

पस्तिसावी केली, विष्णु वल्लभेसी ॥ काय तू बघसी, अंत माझा ॥३५॥

छत्तिसावी केली, किती तुज गाऊ ॥ अंत नको पाहू, अंबाबाई ॥३६॥

सदतिसावी केली, धरिते तुझय पाया ॥ पावन ही काया करी माझी ॥३७॥

अडतिसावी करुनी, मत्कुलस्वामिनी ॥ पाह सिंहासनी, रूप तुझे ॥३८॥

एकोणचाळिसावी, करुनी तव ध्यान ॥ असे उभी दीन, द्वारी तुझ्या ॥३९॥

चाळिसावी होता, गुण गाई तुझे ॥ कृष्णा प्रार्थी माझे दुःख हरी ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 31, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP